Site icon sarkariyojanamaharashtra.com

Nari Shakti Doot Application Form Registration Login full process-नारीशक्ती दूत ॲपद्वारे लाडकी बहीणसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?संपूर्ण पद्धत पहा

Nari Shakti Doot Application Form Registration Login full process-नारीशक्ती दूत ॲपद्वारे लाडकी बहीणसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण पद्धत पहा.

Nari Shakti Doot Registration Login – मित्रांनो ३ जुलै २०२४ पासून नारीशक्ती दूत ॲप (Nari Shakti Doot app) प्ले स्टोर वर उपलब्ध झाली आहे . आता पर्यंत या अँपचे लाखो डाऊनलोड्स झालेत. परंतु हजारो लोकांना या अँपद्वारे ऑनलाईन अर्ज करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात अनेक वेळा एरर येत आहे. या मुळे मी आज तुम्हाला  फॉर्म भरण्याचा पूर्ण स्टेप्स आपल्याला येथे देत आहे . सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या योजनेसाठी अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया मोफत असणार आहे.  Nari doot Application form Registration Login कस करायचं पूर्ण माहिती खाली दिली आहे, तर आपण या लेखात Nari Shakti Doot Registration Login ची संपूर्ण माहिती पाहुयात.

हे पण पहा-Mukhyamantri yuva karya yojana

  1. सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्ले-स्टोअर वरुन Narishakti Doot नावाचं राज्य सरकारनं तयार केलेलं ॲप्लिकेशन डाऊनलोड किंवा या लिंक वरून डाउनलोड करायचं आहे आणि ते Install करायचं आहे.
  2. ते केलं की पुढे या Application विषयी माहिती दिलेली दिसेल.
  3. आता दुसरी स्टेप पाहुयात.

 

 

हे पण पहा-बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२४

 

  1. नंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेता का, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. होय किंवा नाही, असं हे उत्तर द्यायचं आहे. होय असेल तर लाभाची रक्कम तिथं नमूद करायची आहे.
  2. पुढे लाभार्थ्यांची वैवाहिक स्थिती निवडायची आहे. अर्जदार महिलेनं अविवाहित, विवाहित,विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित इ.पैकी योग्य पर्याय निवडायचा आहे.
  3. त्यानंतर अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे. यात बँकेचे पूर्ण नावटाकायचे आहे.
  4. खातेधारकाचं नाव टाकायचे आहे, खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकायचा आहे. आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का, असा प्रश्न तिथं असेल. हो किंवा नाही ते उत्तर निवडायचं आहे. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर तो लिंक करुन घ्यायचा आहे.
  1. त्यानंतर आपण, Accept हमीपत्र या पर्यायावर क्लिक करुन खालील स्वीकारा या पर्यायावर क्लिक आहे आणि मग माहिती जतन करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  2. त्यानंतर तुम्ही भरलेली सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल, ती माहिती वाचून फॉर्म सबमिट करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  3. त्यानंतर अर्जदाराच्या  मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाकला की तुमचा फॉर्म सबमिट होईल.
  4. मग मुख्य पेजवर तुमचा अर्ज, त्याची स्थिती दाखवली जाईल. तिथं सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच अर्जाचा क्रमांक दिला जाईल. जो तुम्हाला अर्जाची स्थिती जाणून घेण्याकरता वापरता येईल.
  5. अशाप्रकारे तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल अर्ज व्यवस्थित वाचूनच भरावा मग अर्जात काही चूक होणार नाही.

सूचना – ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया नुकतीच सुरू झाल्यामुळे अर्ज भरताना काही वेळेस तुम्हाला अडचण येऊ शकते. माहिती अपलोड होण्यास विलंब लागू शकतो मग पुन्हा प्रयत्न करावा.

  1. अर्ज दाखल केल्यानंतर त्याची छाननी प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर पात्र अर्जदारांची माहिती प्रसिद्ध केली जाईल.
  2. या योजनेसाठी राज्य आणि जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे.
  3. योजनेसाठीचे अंतिम पात्र लाभार्थी ठरवणे आणि योजनेवर देखरेख ठेवण्याचं काम ही समिती करणार आहे.
  4. अर्ज केल्यानंतर पुढे काय होईल, याविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात म्हणाले की, “जो आपला जुना डेटाबेस आहे त्याची माहिती घेऊन ज्यांचं अडीच लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे, त्यांच्या खात्यात तत्काळ पैसे जमा करण्यात येईल. पण समजा त्यांचे अर्ज जुलै महिन्याच्या शेवटी आले, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रक्रिया झाली, तर जुलै-ऑगस्ट दोन्ही महिन्याचे पैसे त्यांना मिळतील.”

आपल्याला अर्ज  करताना कदाचित Error येऊ शकतो. तरी काळजी करू नये. जास्त Request असल्याने आपल्याला अशी एरर येऊ शकते. तेव्हा आपण काही वेळाने किंवा रात्री उशिरा प्रयत्न करावा कारण त्यावेळेस कमी यूजर्स असतात.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज sarkariyojanamaharashtra.com ला भेट द्या.

हे पण पहा-महाराष्ट्र राज्य सरकारचा ‘आनंदाचा शिधा’ उपक्रम

Exit mobile version