Site icon sarkariyojanamaharashtra.com

Mukhyamantri Varkari Mahamandal-मुख्यमंत्री वारकरी महामंडळ-महाराष्ट्रातील कीर्तनकार आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन.

“मुख्यमंत्री वारकरी महामंडळ”

महाराष्ट्रातील कीर्तनकार आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन.

 

Mukhyamantri Varkari Mahamandal-

नमस्कार,

आपले स्वागत आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, धार्मिक आणि सामाजिक समतेचा वारसा खूपच महान आहे. आपले  प्रेरणास्रोत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, महाराष्ट्राने विविधतेची आणि समृद्धतेची उधळण केली आहे.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, जिथे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत मुक्ताबाई यांसारख्या थोर संतांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे. पंढरपूरची वारी, जी सुमारे 800 वर्षांपासून सुरू आहे, ती महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे. या वारीत लाखो भक्त सहभागी होतात, ज्यामुळे समाजात समता आणि बंधुभावाचे दर्शन घडते.

मुख्यमंत्री यांनी वारीच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे वारीचे सूक्ष्म नियोजन आणि आयोजन अधिक सुलभ होईल. “Mukhyamantri Varkari Mahamandal” या नवीन योजनेमुळे वारीतील सहभागी भक्तांना अधिक सुविधा उपलब्ध होतील.यामध्ये अन्न, निवारा, सुरक्षा, वैद्यकीय मदत, स्वच्छता, आरोग्य, आणि इतर पायाभूत सुविधांची व्यवस्था केली जाईल.

  • महामंडळाचे उद्दिष्ट:

  1. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या समस्यांचे निराकरण करणे.
  2. सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गाच्या सुधारणा करणे.
  3. वारकऱ्यांना सुरक्षा आणि विमा संरक्षण उपलब्ध करणे.
  4. वारकरी भजनी मंडळांना साधनसामग्रीसाठी अनुदान देणे.
  5. कीर्तनकारांना आरोग्य विमा आणि मानधन सन्मान योजना राबवणे.
  6.  विविध मंदिरांना आणि पवित्र स्थळांना सुधारित करणे.
  7. नद्यांना प्रदूषणमुक्त करणे.
  8. वृद्ध वारकऱ्यांसाठी “वारकरी पेंशन” योजना सुरु करणे.
  9. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणे.
  • महामंडळाचे मुख्यालय:

मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल. महामंडळाचे व्यवस्थापन भारतीय प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील असणार आहे. महामंडळाचे भागभांडवल रु. 50 कोटी इतके असेल.

  • तत्काल कार्यवाही:

  1. सर्व पालखी सोहळ्यांसाठी वारी व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करणे.
  2. पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर, शेगाव, तुळजापूर, आणि इतर तीर्थक्षेत्रांचा विकास करणे.
  3. पंढरपूर येथील चंद्रभागा नदीचे दोन्ही बाजूस घाट निर्माण करणे.
  4. महिलांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, प्रसाधन गृह, वस्त्रांतर व इतर सुविधा पुरवणे.
  1. वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी आणि प्रश्न सोडवणे.
  2. सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गांची सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, निवारा आणि सुविधा यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करणे.
  3. आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा आणि विमा संरक्षण देणे.
  4. वारकरी भजनी मंडळांना वाद्ये (टाळ, मृदुंग, वीणा) खरेदीसाठी अनुदान देणे.
  5. भजनीकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना राबवणे.
  6. आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी विध्यार्थ्यांना वार्षिक अनुदान देणे.
  7. पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिपंळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारेश्वर, भगवानगड, अगस्त ऋषी, संत सावता माळी समाज मंदिर, अरण ता. माढा क. सोलापूर व इतर तीर्थक्षेत्रांचा विकास करणे.
  8. चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी आणि इतर नद्यांमधील प्रदूषण कमी करण्याबाबत योजना करणे.
  9. पायी वारी करणाऱ्या वृद्ध वारकऱ्यांसाठी “वारकरी पेन्शन” योजना सुरू करणे.
  10. ‘पूज्य सद्गुरु मोगोबाबा वारकरी शिक्षण संस्था, आळंदी’ आणि इतर संस्थांना साहित्य, शिक्षण वर्ग आणि इमारत हॉल यासाठी भरीव निधी देणे.
  11. संत गोरोबा काका सेवा मंडळ, तेर पकरसर, ता.कि. उस्मानाबाद (धाराशिव) येथे सभामंडपासाठी निधी मंजूर करणे.
  12. श्री संत मुक्ताबाई संस्थान, मुक्ताईनगर पालखी मार्ग आणि समाधी स्थळासाठी निधी देणे.
  13. पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूंना घाट विकसित करणे.
  14. पंढरपूर येथे म्हसोबा मंदिर ते कवित्री घाटापर्यंत चंद्रभागेवर पादचारी मार्ग किंवा झुलता पूल तयार करणे.
  15. पंढरपूर येथे 65 एकरमध्ये वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उभारणे.
  16. सर्व पालखी सोहळ्यांचे मार्ग व्यवस्थीत करून त्यासाठी कायमस्वरूपी निधी मंजूर करणे.
  17. आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफ करणे.
  18. महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, प्रसाधनगृहे आणि इतर सोयीसुविधा पुरवणे.

हे महामंडळ महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायआणि कीर्तनकार यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, त्यांच्या सोयीसाठी शासनाने केलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे.

संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी अधिसूचना पाहू शकता, कृपया ही माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा.. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज sarkariyojanamaharashtra.com ला भेट द्या.

आपण सर्वांनी मिळून ही पोस्ट आपल्या मित्रमंडळींसोबत आणि कुटुंबीयांसोबत शेअर करावी, जेणेकरून अधिकाधिक लोकांना याची माहिती होईल आणि आपण सर्वांनी मिळून हा उद्देश साध्य करू शकू.

धन्यवाद!

Exit mobile version