Site icon sarkariyojanamaharashtra.com

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय श्री.अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) घोषणा केली आहे.या अंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिला व मुली याचा लाभ घेऊ शकतील,या अंतर्गत त्यांना सरकार  दरमहा १५०० रुपये देणार आहे.योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे की राज्यातील गरीब वर्गातील महिलांना आर्थिक बळ प्रदान व्हावे.यामुळे महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर  बनण्याची  संधी मिळेल आणि त्यांच्या कुटुंबासाठी मदतही करता येईल. आता ही माझी लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे ? या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण अर्ज करू शकतो ? आणि त्यासाठीची प्रक्रिया काय? याची सविस्तर माहिती घेऊयात.

काय आहे नेमकी लाडकी बहीण (Ladki Bahin) योजना?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ सुमारे एक कोटी मुली व  महिलांना घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयो गटातील पात्र मुली व  महिलांना महाराष्ट्र शासना मार्फत दरमहा दीड हजार(१५००) रुपये देण्यात येणार  आहेत. या साठी वर्षाला दोन लाख पन्नास  हजार पाचशे  रुपये पेक्षा कमी आवक असायला हवे . राज्यातील  मुलींना व महिलांना स्वावलंबी , आत्मनिर्भर करण्यासाठी ,तसेच  त्यांच्या वर अवलंबून
असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती त सुधारणा व्हावी या साठी राज्य सरकारने ही महत्त्वपूर्ण योजना घोषित केली आहे.

कोण अर्ज करू शकतो?

  1. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  2. राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला .
  3. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  4. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यां चे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  5. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २५०००० लाखा पेक्षा जास्त नसावे.

कोण अपात्र असेल?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता निश्चित करण्यासाठी आठ निकषांमध्ये खालीलप्रमाणे असलेली अपात्रता निश्चित  करण्यात आलेली आहे,

  1. कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
  2. कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  3. कुटुंबातील सदस्य सरकारी विभागातील नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत, पण बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले किंवा स्वयंसेवी कामगार अपात्र ठरणार नाहीत.
  4. सदर लाभार्थी महिलेने इतर शासकीय विभागांच्या योजनांमध्ये 1500 रुपये जास्त लाभ घेतला नाही.
  5. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य माजी खासदार, आमदार नाहीत.
  6. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य नाहीत.
  7. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही.
  8. ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत नाहीत.

ह्या निकषांच्या माध्यमातून अपात्रतेची सुनिश्चिती केली जाते आणि योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचे लाभ प्रदान करण्यात मदत केली जाते.

कोणती कागदपत्रे लागतील?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे लागतील,

  1. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
  2. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
  3. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला.
  4. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला.
  5. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.
  6. पासपोर्ट आकाराचा फोटो
  7. शिधा पत्रिका (रेशन कार्ड)
  8. योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.

अर्ज कसा करावा?

अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे,

  1. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
  2. योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल app द्वारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात.
  3. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
  4. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी /ग्रामीण/आदिवासी )/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
  5. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी /ग्रामीण/आदिवासी )/सेतू सुवि धा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वी रित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथा योग्य पोच पावती दिली जाईल.
  6. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल.

या तारखेपासून अर्ज करता येईल?

  1. जुलै २०२४ अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होईल.
  2. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिवस १५  जुलै २०२४  आहे.
  3. तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक १६ जुलै २०२४  तात्पुरत्या यादी वरील तक्रार/ हरकती प्राप्त करण्याचा काला वधी २१  जुलै ते ३०  जुलै आहे.
  4. अंतिम यादी प्रकाशन दिनांक १ ऑगस्ट २०२४ आहे.

महत्वाच्या लिंक:

१) शासन निर्णय

२) “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजना अर्ज 

 

Exit mobile version