Mukhyamantri Annpurna Yojana-मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024: दरवर्षी मिळणार ३ गॅस सिलिंडर मोफत,काय आहे ते पहा,
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,
महाराष्ट्र सरकारने गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” सुरु केली आहे, ज्यामुळे राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. ही योजना विशेषतः प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे. योजनेचा उद्देश स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे आणि महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे हा आहे. तर आपण याची संपूर्ण माहिती पाहुयात,
Mukhyamantri Annpurna Yojana-योजनेचा उद्देश:
स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन:
- देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी धुरमुक्त वातावरणात स्वच्छ इंधन पुरवणे हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
महिलांचे सक्षमीकरण:
- महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करून त्यांचे सक्षमीकरण करणे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
लाभार्थ्यांची पात्रता:
- लाभार्थ्यांच्या नावावर गॅस जोडणी असणे आवश्यक आहे.
- प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पात्र लाभार्थी योजनेसाठी पात्र असतील.
- एका कुटुंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थीच योजनेस पात्र असेल.
- केवळ 14.2 किलोग्राम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना लाभ मिळेल.
कागदपत्रांची आवश्यकता:
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
योजनेची कार्यपद्धती:
- तेल कंपन्यांच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे सवलतीचे वितरण केले जाईल.
- लाभार्थ्यांच्या बँक खात्यात राज्य शासनाच्या वतीने 530 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी जमा केली जाईल.
सबसिडी प्रक्रिया:
- सद्यःस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम (सरासरी रु. 830/-) ग्राहकांकडून घेतली जाते. तद्नंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात येणारी (रु. 300/-) सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
- एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी सबसिडी दिली जाणार नाही.
- राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी तेल कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी.
योजनेचा फायदा:
ही योजना केवळ गॅस सिलेंडर पुरवठ्यापर्यंत मर्यादित नाही, तर तिचे उद्दिष्ट आहे गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे. धुरमुक्त वातावरणात स्वयंपाकामुळे महिलांचे आरोग्य सुधारेल, तर वृक्षतोडीला आळा बसेल.ही योजना पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. आपल्या सरकारने आपल्यासाठी केलेल्या या प्रयत्नांचा लाभ घ्या आणि आपल्या कुटुंबाला उज्ज्वलता द्या!आणि ही माहिती आपल्या जवळच्या नातेवाईक,मित्रमंडळी सोबत नक्की शेअर करा,जेणेकरून त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल.