Mukhyamantri yuva karya yojana-मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता.
Mukhyamantri yuva karya yojana-राज्यातील युवकांचे शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय यांसाठी बाहेर पडत आहेत. परंतु, त्यांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणी येतात. बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना:
2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे ही योजना राबवली जाणार आहे.
योजनेचे स्वरूप:
- उमेदवारांची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी, उपस्थिती नोंदविणे, वेतन अदा करणे इ. सर्व कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल.
- बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले उमेदवार ऑनलाईन नोंदणी करतील.
- SMEs, मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, सरकारी, निमसरकारी आस्थापना/महामंडळ, सामाजिक संस्था इ. मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवतील.
उमेदवारांची पात्रता:
- वय: 18-35 वर्षे
- शैक्षणिक पात्रता: 12वी पास, आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर
- महाराष्ट्राचा अधिवासी
- आधार नोंदणी
- बँक खाते आधार संलग्न असावे
- कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी
आस्थापना/उद्योगाची पात्रता:
- महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणे
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी
- स्थापना कमीत कमी 3 वर्षे पूर्वीची असावी
- EPF, ESIC, GST, Certificate of incorporation, DPIT व उद्योग आधार ची नोंदणी असावी
कार्यप्रशिक्षण कार्यक्रम:
- उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक
- आस्थापना/उद्योगामार्फत प्रत्यक्ष कार्यप्रशिक्षण देण्यात येईल
- प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने
- प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र
- प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा वेतन अदा करण्यात येईल: 12वी पास – 6000 रु., आयटीआय/पदविका – 8000 रु., पदवीधर/पदव्युत्तर – 10000 रु.
योजनेचे नियमन व आढावा:
- राज्यस्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्यात येत आहे.
- समितीची बैठक दर 4 महिन्यांनी अथवा आवश्यकतेनुसार घेण्यात येईल.
- समितीमध्ये मुख्य सचिव अध्यक्ष असतील व विविध विभागांचे सचिव सदस्य असतील.
शासन निर्णय:
Pingback: Nari Shakti Doot Application Form Registration Login full process-नारीशक्ती दूत ॲपद्वारे लाडकी बहीणसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?संपूर्ण