Pink E-Riksha Scheme Approved -राज्यातील गरजू महिलांसाठी रोजगाराची नवी संधी: “पिंक ई-रिक्षा” योजना मंजूर.
राज्यातील गरजू महिलांसाठी रोजगारासाठी “पिंक (गुलाबी) ई-रिक्शा” उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत
प्रस्तावना:
उपमुख्यमंत्री (वित्त), महाराष्ट्र राज्य यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात “पिंक ई-रिक्शा – 17 जिल्ह्यांतील 10 हजार महिलाांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य” उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देण्याच्या हेतूने आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी ई-रिक्शा उपलब्ध करून देण्यात येईल तर आपण याच्यासंबंधीत अधिक माहिती आपण खाली पाहुयात.
शासन निर्णय:
राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी “पिंक (गुलाबी) ई-रिक्शा” योजना राज्यात लागू करण्यास शासन मान्यता देत आहे.
लाभार्थी जिल्ह्यांची संख्या:
अ. क्र. | जिल्हा | लाभार्थी |
---|---|---|
1 | मुंबई उपनगर | 1400 |
2 | ठाणे | 1000 |
3 | पुणे | 1400 |
4 | नाशिक | 700 |
5 | नागपूर | 1400 |
6 | कल्याण | 400 |
7 | अहमदनगर | 400 |
8 | नवी मुंबई | 500 |
9 | पिंपरी | 300 |
10 | अमरावती | 300 |
11 | पिंपरी-चिंचवड | 300 |
12 | पंनवेल | 300 |
13 | छत्रपती संभाजीनगर | 400 |
14 | डोंबिवली | 400 |
15 | वसई-विरार | 400 |
16 | कोल्हापूर | 200 |
17 | सोलापूर | 200 |
एकूण: 10,000
पिंक ई-रिक्षा योजनेची कार्यप्रणाली:
- अर्ज प्रक्रिया: इच्छुक महिला पिंक ई-रिक्षासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करतील.
- छाननी जबाबदारी: प्राप्त अर्जांची अंतिम छाननी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे असेल.
- माहिती पुरवठा: पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदीसाठी शासनाने निर्दिष्ट केलेल्या बँका आणि वाहन पुरवठादार एजन्सींची माहिती दिली जाईल.
- कर्ज प्रक्रिया: अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनाने निर्दिष्ट केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असलेल्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मंजूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करून कर्ज मंजूर करून घेईल.
- कर्ज परतफेड जबाबदारी: बँकेकडून घेतलेल्या 70% कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील.
- कर्ज मंजुरीनंतर पेमेंट: बँकेने अर्जदारास रिक्षाच्या किंमतीच्या 70% कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला 10% रक्कम भरेल.
- सरकारी योगदान: अर्जदारास रिक्षा मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी 20% रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत दिली जाईल.
- वाहन वितरण: रिक्षा खरेदीची संपूर्ण रक्कम संबंधित वाहन एजन्सीकडे जमा झाल्यानंतर वाहन अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येईल.
- तपासणी आणि अंमलबजावणी: पिंक रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालवली जात आहे याची तपासणी वाहतूक नियंत्रण पोलिस विभाग आणि परिवहन विभागाची जबाबदारी राहील. पिंक रिक्षा पुरुष चालवताना आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- स्वावलंबन: लाभार्थी महिला पिंक रिक्षा चालवून उत्पन्न मिळवून स्वावलंबी व्हावी.
- नियमांची अंमलबजावणी: योजनेची अंमलबजावणी नियमांनुसार करण्याची जबाबदारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयाची राहील.
- कर्ज परतफेड न झाल्यास प्रक्रिया: योजनेच्या लाभार्थी महिलेने रिक्षा न चालवणे किंवा कर्जाची रक्कम फेड न केल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी त्या महिलेच्या अडचणी लक्षात घेऊन समस्या सोडवतील. तरीही समस्या कायम राहिल्यास बँकेशी चर्चा करून आवश्यक ती कारवाई केली जाईल.
- प्रक्रियेत बदल: योजनेची अंमलबजावणी सोपी व्हावी यासाठी प्रक्रियेत बदल करण्याचे अधिकार मा. मंत्री, महिला व बाल विकास यांना राहतील.
पिंक ई-रिक्षाचे तपशील:
- किंमत (सर्व करांसह)
- पिंक ई-रिक्षाची कमाल किंमत, सर्व करांसह, रु. 4.00 लाख आहे.
- मोटर क्षमता
- मोटर क्षमता 10 एच.पी. (हॉर्सपॉवर) आहे.
- प्रति चार्ज मायलेज
- प्रति चार्ज अंदाजे 110 किमी प्रवास करता येईल.
- आसन क्षमता
- वाहनामध्ये 3 प्रवासी आणि 1 चालक, अशा एकूण 4 व्यक्ती बसू शकतात.
योजनेचा उद्देश:
- राज्यातील महिला व मुलींना सुरक्षित सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे.
- आर्थिक, सामाजिक उन्नती साधणे.
- महिला व मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे.
- सुरक्षित प्रवासासाठी सुविधा उपलब्ध करणे.
- महिलांना सशक्त बनवणे.
योजनेचे स्वरूप:
- ई-रिक्शाची किंमत (GST, Registration, Road Tax यांचा समावेश)
- नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि अनुमत्य खाजगी बँकांमधून 70% कर्ज उपलब्ध.
- राज्य शासन 20% आर्थिक भार उचलेल.
- लाभार्थी महिलांवर 10% आर्थिक भार.
- कर्जाची परतफेड 5 वर्षे (60 महिने).
लाभार्थी पात्रता:
- लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावे.
- वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे.
- लाभ घेण्यासाठी बँक खाते असावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.3.00 लाखांपेक्षा कमी असावे.
- वाचन चालक परवाना असावा.
- विधवा, घटस्फोटीत, अनाथ प्रमार्पपत्र असलेले आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना प्राधान्य.
कागदपत्रे:
- ऑनलाईन अर्ज.
- आधार कार्ड व पॅन कार्ड.
- महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र.
- कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न प्रमाणपत्र.
- बँक खाते पासबुक.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- मतदार ओळखपत्र.
- रेशन कार्ड.
- चालक परवाना.
- रिक्षा चालवण्याचे प्रमाणपत्र.
- योजनेच्या अटी व शर्ती मान्य असल्याचे प्रमाणपत्र.
लाभार्थी निवड:
- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थींची निवड करेल.
- लाभार्थींच्या संख्येपेक्षा अर्ज जास्त असल्यास लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल.
नियंत्रक अधिकारी:
आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे.